Bharat Ratna Puraskar: भारत रत्न पुरस्कार 1954 ते 2024 संपूर्ण माहिती.

Bharat Ratna Puraskar :भारत रत्न पुरस्कार विषयी सविस्तर माहिती:-

Bharat Ratna Puraskar:- भारत रत्न पुरस्कार हा भारतामधील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. भारत रत्न पुरस्काराची सूरवात 1954 मध्ये झाली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी त्याची घोषणा केली होती. भारत रत्न हा पुरस्कार 26 जानेवारी म्हणजे भारताच्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतीच्या हस्ते देण्यात येतो. भारतरत्न पुरस्कार समितीच्या सल्ल्यानुसार भारताचे पंतप्रधान पुरस्काराचा निर्णय घेतात व राष्ट्रपतीला शिफारस करतात. समितीमध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहमंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा समावेश असतो.

Bharat Ratna Puraskar

Bharat Ratna Puraskar : भारत रत्न पुरस्कार सूरवात :-

भारत रत्न पुरस्काराची सुरवात 1954 मध्ये झाली. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यासबंधी घोषणा केली होती. सुरवातीला हा पुरस्कार हयात व्यक्तीला देण्यात येत आसे पण 1955 साली यामध्ये लगेचच सुधारणा करून मरणोत्तरही हा पुरस्कार दिला जाईल आशी सुधारणा करण्यात आली. भारतरत्न पुरस्कारामध्ये आणखी एक सुधारणा करण्यात आली ती म्हणजे आगोदर हा पुरस्कार कला, राजकारण, साहित्य व विज्ञान या क्षेत्रामध्ये दिला जात आसे पण 2011साली यामध्ये सुधारणा करून मानव कल्याणासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला हा पुरस्कार देण्याचे ठरविले.

Bharat Ratna Puraskar : भारत रत्न पुरस्कार स्वरूप :-

भारत रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला राष्ट्रपतीची सही असलेले सन्मानपत्र (सनद) व पदक मिळते. हे पदक कांस्य या धातूचे बनलेले असते. भारत रत्न पदकाचा आकार पिंपळाच्या पानाचा असतो. पदकाच्या वरच्या बाजूला प्लैटिनम धातूपासून बनलेला उगवता सूर्य असतो. त्याखाली “भारत रत्न” आसे लिहलेले असते. पदकाच्या मागच्या बाजूला भारताचे राष्ट्रीय चिन्ह चार सिहांची राजमुद्रा व आदर्श घोषवाक्य ” सत्यमेव जयते ” कोरलेले असते. पदकाच्या कडा व राजमुद्रा प्लैटिनम धातूच्या असतात. भारत रत्न पुरस्कारामध्ये देण्यात येणारे पदक प. बंगाल मधील अलीपूर येथील टांकसाळ मध्ये बनवण्यात येते. भारत रत्न पुरस्कारामध्ये कोणतीही धनराशी मिळत नाही.

भारत रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला मिळणाऱ्या सुविधा :-

  • भारतीय प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन समारंभात सन्मानीय अतिथी.
  • संसदेच्या बैठका व सत्रामध्ये सहभागी होण्याची सवलत.
  • भारतमध्ये कोठेही जाण्यासाठी मोफत प्रथम श्रेणी विमान व रेल्वे प्रवास
  • पंतप्रधानाच्या वेतना एवढे किंवा त्याच्या 50% एवढे निवृत्ती वेतन.
  • माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट स्तराचे मंत्री, लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतरच्या सातव्या स्थानाच्या दर्जाचा सन्मान ‘भारतरत्न’ प्राप्त व्यक्तीला दिलेला आहे.
  • आवश्यकतेनुसार Z श्रेणीची सुरक्षा

Bharat Ratna Puraskar List : भारत रत्न पुरस्कार यादी:-

भारत रत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती यादी :- 1954 ते 2024
क्रमांकविजेते पुरस्कृत वर्ष क्षेत्र
1)डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन1954भारताचे प्रथम उपराष्ट्रपती
2)चक्रवर्ती राजगोपालचारी 1954शेवटचे गव्हर्नर जनरल.
3)डॉ. C.V.रमण 1954विज्ञान
4)डॉ. भगवान दास 1955भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते
5)डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या 1955 प्रथम अभियंता व बँक ऑफ म्हैसूर चे संस्थापक
6)पं. जवाहरलाल नेहरू 1955भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते व भारताचे प्रथम पंतप्रधान
7)गोविंद वल्लभ पंत 1957भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व उत्तर प्रदेश चे प्रथम मुख्यमंत्री
8)धोंडो केशव कर्वे 1958समाजसुधारक
9)डॉ. बिधान चंद्र रॉय 1961पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री
10)पुरुषोत्तम दास टंडन1961 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
11)डॉ. राजेंद्र प्रसाद 1962भारताचे प्रथम राष्ट्रपती
12)डॉ. झाकिर हुसेन1963भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
13)महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे1963शिक्षणप्रसारक
14)लाल बहादूर शास्त्री
(प्रथम मरणोत्तर )
1966भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे दुसरे पंतप्रधान
15)इंदिरा गांधी 1971भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
16)वराहगिरी वेंकट गिरी 1975भरताचे चौथे राष्ट्रपती
17)के. कामराज (मरणोत्तर)1976भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व मद्रास राज्याचे मुख्यमंत्री
18)मदर तेरेसा 1980समाजसेवक व  मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक
19)आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर)1983भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व समाजसुधारक
20)खान अब्दुल गफार खान 1987भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते
21)एम.जी. रामचंद्रन (मरणोत्तर)1988तमिळ चित्रपट अभिनेते व तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री
२२)डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर)1990भारतीय संविधानाचे जनक, मानवी हक्कांचे कैवारी, अर्थशास्त्रज्ञ व भारताचे पहिले कायदामंत्री
23)नेल्सन मंडेला 1990वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते, द. आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष
24)राजीव गांधी (मरणोत्तर)1991भरताचे सातवे पंतप्रधान
25)सरदार वल्लभ भाई पटेल (मरणोत्तर)1991भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री
26)मोरारजी देसाई 1991भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पाचवे पंतप्रधान
27)मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) 1992भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री
28)जे. आर. डी. टाटा 1992 उद्योजक
29)सत्यजित रे1992बंगाली चित्रपट निर्माते
30)डॉ. ए.पी .जे. अब्दुल कलाम 1997थोर शास्त्रज्ञ व भारताचे ११वे राष्ट्रपती
31)गुलझारीलाल नंदा1997भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पंतप्रधान
32)अरुणा असफ अली (मरणोत्तर) 1997भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या
33)एम. एस. सुब्बलक्ष्मी 1998संगीत (कर्नाटक शैलीतील गायिका)
34)चिदंबरम सुब्रमण्यम1998भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे कृषीमंत्री
35)जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) 1999भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
36)रवी शंकर 1999प्रसिद्ध सितारवादक
37)अमर्त्य सेन1999प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ
38)गोपीनाथ बोरदोलोई (मरणोत्तर) 1999भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व आसामचे मुख्यमंत्री
39)लता मंगेशकर 2001संगीत ( पार्श्वगायिका)
40)बिस्मिल्ला खान 2001 सनईवादक
41)भीमसेन जोशी2008 शास्त्रीय गायक
42)सी. एन.आर.राव 2014 शास्त्रज्ञ
43)सचिन तेंडूलकर 2014खेळाडू
44)मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) 2015भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक
45)अटलबिहारी वाजपेयी2015भारताचे पंतप्रधान
46)नानाजी देशमुख (मरणोत्तर) 2019सामाजिक कार्यकर्ते
47)भूपेन हजारिका (मरणोत्तर) 2019 गायक
48)प्रणव मुखर्जी2019भारताचे १३ वे राष्ट्रपती
49)कर्पुरी ठाकूर (मरणोत्तर) 2024बिहारचे 11 वे मुख्यमंत्री
50)लालकृष्ण अडवाणी2024माजी उप-पंतप्रधान
51)पी. व्ही. नरसिंहराव (मरणोत्तर) 2024माजी पंतप्रधान
52)चौधरी चरण सिंह (मरणोत्तर) 2024माजी पंतप्रधान
53)एम. एस. स्वामिनाथन (मरणोत्तर) 2024भारतीय कृषी शास्त्रज्ञ

भारत रत्न पुरस्कारा विषयी काही महत्वाचे:-

  • भारतरत्न हा शब्द नावाआधी लिहिण्याचा एक पदवी किंवा किताब म्हणून वापरता येत नाही.
  • इ.स. १९९२ साली सुभाषचंद्र बोस यांच्या नावाची ‘भारतरत्‍न’ पुरस्कारासाठी घोषणा करण्यात आली होती. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने व त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधामुळे त्यांचे नाव मागे घेण्यात आले.
  • एखाद्या व्यक्तीला दिले गेलेले पदक काढून घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.
  • एकदा काढून घेतलेले पदक पुन्हा त्या व्यक्तीला परत करण्याचा अधिकारही राष्ट्रपतींना आसतो.
  • जात, व्यावसायिक प्रतिष्ठा, लिंगभेद यापैकी कशाचाही परिणाम या पुरस्काराची पात्र व्यक्ती ठरविताना होणार नाही.

FAQs:-

प्रथम मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

प्रथम मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार “लाल बहादूर शास्त्री” यांना मिळाला आहे.

भारत रत्न पुरस्कार प्रथम कोणत्या महिलेला मिळाला आहे ?

प्रथम भारत रत्न महिला पुरस्कार “इंदिरा गांधी ” यांना मिळाला आहे

आतापर्यंत एकूण किती व्यक्तींना भारत रत्न पुरस्कार मिळाला आहे ?

आतापर्यंत एकूण 53 व्यक्तींना भारत रत्न पुरस्कार मिळाला आहे ?

अधिक माहितीसाठी हे पाहा :-

अधिक माहितीसाठी हे वाचा:- Click Here

हे ही वाचा :-

Maharashtra Bhushan Puraskar : महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 ते 2023 संपूर्ण माहिती.

Maharshtra Police Bharti 2024 : राज्यात लवकरच भरली जाणार पोलिसांची 17471 पदे शाषण निर्णय (Gr) प्रसिद्ध…

Rrb Technician Recruitment 2024: रेल्वे मध्ये Technician या पदाच्या 9000 जागांसाठी भरती …

Mpsc Time Table 2024:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडून 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर.

Talathi Bharati 2023 All Shift Question Paper Free Pdf Download: तलाठी भरती प्रश्नपत्रिका 2011ते 2023 Pdf Download

1 thought on “Bharat Ratna Puraskar: भारत रत्न पुरस्कार 1954 ते 2024 संपूर्ण माहिती.”

Leave a Comment