Oscar Awards 2024 : ऑस्कर पुरस्कार 2024 संपूर्ण माहिती…

Oscar Awards 2024 : ऑस्कर पुरस्कार 2024 विषयी संपूर्ण माहिती.

Oscar Awards 2024 : ऑस्कर पुरस्कार 2024 :- चित्रपट क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ समजला जाणारा Oscar Awards /ऑस्कर पुरस्कार सोहळा 10 मार्च 2024 रोजी अमेरिकेतील लॉस एंजलीस या शहरामधील डॉल्बी थिएटर मध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. Oscar Awards 2024 हे या पुरस्कार सोहळ्याचे 96 वे संस्करण होते. या पुरस्कार सोहळ्याचे चौथ्यांदा सूत्र संचालन हॉलीवूड चित्रपटामधील विनोदी अभिनेते जिमी किमेल यांनी केले. ऑस्कर पुरस्कार 2024 (Oscar Awards 2024) मध्ये सर्वात जास्त 13 नामांकन ओपेनहाइमर या चित्रपटाला मिळाले होते. 13 नामांकाना पैकी ओपेनहाइमर या चित्रपटाने सर्वाधिक 7 पुरस्कार जिंकले.ऑस्कर पुरस्कार 2024 ची संपूर्ण माहिती सविस्तर पणे आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

Oscar Awards/ ऑस्कर पुरस्कारांविषयी महत्वपूर्ण माहिती थोडक्यात:-

ऑस्कर पुरस्काराची स्थापना 1927 मध्ये झाली. पण प्रथमता हा पुरस्कार 1929 मध्ये देण्यात आला. ऑस्कर पुरस्काराला “अकादमी पुरस्कार” आसे देखील म्हणतात. एकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस एंड साइंसेज ( AMPAS ) द्वारा हा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात येतो. ऑस्कर पुरस्कारामध्ये सोन्याचा मुलामा असलेली एक मूर्ती देण्यात येते सर्वसाधारणपणे तिलाच ऑस्कर म्हणतात.

Oscar Awards 2024 Winners List : ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी…

Oscar Awards 2024 Winners List
ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी….
( संस्करण 96 वे )
अ. क्र.श्रेणी विजेत्याचे नाव चित्रपट
1सर्वश्रेष्ठ अभिनेत्री एम्मा स्टोन पुअर थिंग्स
2सर्वश्रेष्ठ अभिनेता किलीयन मर्फी ओपेनहाइमर
3सर्वश्रेष्ठ चित्रपट ओपेनहाइमर
( क्रिस्टोफर नोलन )
ओपेनहाइमर
4सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनओपेनहाइमर
5सर्वश्रेष्ठ इंटरनेशनल फिचर फिल्म द जोन ऑफ इंट्रेस्ट द जोन ऑफ इंट्रेस्ट
6 सर्वश्रेष्ठ अभिनेता
(सहायक भूमिका)
रोबर्ट डाउणी जुनियर ओपेनहाइमर
7सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (सहायक भूमिका)डावाइन जॉय रेडॉल्फ द होल्डोवर्स
8सर्वश्रेष्ठ डॉक्युमेंट्रिं फिचर फिल्म 20 डेज इन मेरियुपोल 20 डेज इन मेरियुपोल
9सर्वश्रेष्ठ डॉक्युमेंट्रिं शोर्टफिल्म द लास्ट रिपेयर शॉप द लास्ट रिपेयर शॉप
10सर्वश्रेष्ठ कॉस्ट्यूम डिजाइनहोली वेडिंग्टन पुअर थिंग्स
11सर्वश्रेष्ठ अपडेटेड स्क्रीनप्ले अमेरिकन फिक्शन अमेरिकन फिक्शन
12सर्वश्रेष्ठ ओरीजनल स्क्रीनप्ले एनाटॉमी ऑफ ए फॉलएनाटॉमी ऑफ ए फॉल
13सर्वश्रेष्ठ ओरीजनल सॉंग What Was Eye Made For (बार्बी )
14सर्वश्रेष्ठ ओरीजनल सॉंग स्कोर ओपेनहाइमर ओपेनहाइमर

2024 ऑस्कार पुरस्कार सोहळ्यामध्ये दिले गेलेले आणखी काही महत्वाचे पुरस्कार.

  • बेस्ट एनिमेटेड फिचर फिल्म :- The Boy And The Heron
  • बेस्ट एनिमेटेड Short फिल्म :- war is over inspired by the music of john and yoko
  • बेस्ट लाइव एक्शन Short फिल्म :- द वंडरफूल स्टोरी ऑफ हेनरी शुगर
  • बेस्ट हेअर एंड मेकअप :- पुअर थिंग्स
  • बेस्ट सिनेमैटोग्राफी :- ओपेनहाइमर
  • बेस्ट विजुअल इफेक्टस:- गॉडजिला माईनस वन
  • बेस्ट साउंड :- द जोन ऑफ इंट्रेस्ट
  • बेस्ट फिल्म एडीटिंग :- ओपेनहाइमर
  • बेस्ट प्रोडक्शन डिजाइन :- पुअर थिंग्स
  • हा 96th ऑस्कार पुरस्कार सोहळा होता
  • भारतीय मूळ च्या कॅनडीयन फिल्म मेकर निशा पाहुजा यांच्या ” टू किल ए टाइगर ” या चित्रपटाला ऑस्कार पुरस्कार 2024 मध्ये नामांकन मिळाले होते.
  • सर्वात कमी वयामध्ये ऑस्कार पुरस्कार जिंकणारी भाऊ बहिण यांची जोडी बिली इलीश व फिनेस ओकोनेल बनले आहेत. या दोघांनी 30 वर्षापेक्षा कमी वयामध्ये दोन वेळा ऑस्कार पुरस्कार जिंकून इतिहास घडवला आहे.याअगोदर कमी वयामध्ये ऑस्कार पुरस्कार लूसी रेनर यांनी 28 व्या वर्षी जिंकला होता.

Indian Oscar Winners List : भारतीय ऑस्कार पुरस्कार विजेते यादी :-

1) भानु अथैया :-

ऑस्कार पुरस्कार विजेत्या प्रथम भारतीय भानु अथैया आहेत. त्यांना 1983 मध्ये “गांधी” या चित्रपटातील Costume डिजाइन साठी ऑस्कार पुरस्कार मिळाला आहे. गांधी चित्रपटाचे निर्देशक Richard Samuel Attenborough हे होते.

2) सत्यजित रे :-

सत्यजित रे यांना जागतिक चित्रपटसृष्टी मधील त्यांच्या असामान्य योगदानासाठी 1992 मध्ये जीवनगौरव ऑस्कार पुरस्कार देण्यात आला आहे. सत्यजित रे यांना 1992 मध्येच भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला आहे. सत्यजित रे यांना 1985 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टी मधील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार देखील मिळालेला आहे.

3) रेसुल पुकुटी :-

रेसुल पुकुटी यांना 2009 मध्ये ” स्लम डॉग मिलेनियर ” या चित्रपटातील बेस्ट साउंड मिक्सिंग साठी ऑस्कार पुरस्कार मिळाला आहे.

4) गुलजार :-

” स्लम डॉग मिलेनियर ” या चित्रपटातील “जय हो” या गीताचे गीतलेखन करण्यासाठी ” गुलजार ” यांना 2009 मध्ये ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

5) ए. आर. रहमान :-

” ए. आर. रहमान ” यांना ” स्लम डॉग मिलेनियर ” या चित्रपटातील संगीतासाठी 2009 मध्ये ऑस्कार पुरस्कार मिळाला आहे.

6) कार्तिकी गोन्सालव्हीस :-

कार्तिकी गोन्सालव्हीस यांना 2023 मध्ये त्यांच्या ” The Elephant Whispers या चित्रपटाला बेस्ट Documentary Short या कॅटेगिरी मधील ऑस्कार पुरस्कार मिळाला आहे.

7) M M Keeravani व चंद्रबोस :-

” M M Keeravani व चंद्रबोस ” यांना ” RRR “या चित्रपटातील “नाटु नाटु” या गीतासाठी 2023 मध्ये बेस्ट ओरीजनल सॉंग या कॅटेगिरीतील ऑस्कार पुरस्कार मिळाला आहे.

ऑस्कर पुरस्कार FAQs:-

ऑस्कर पुरस्कार विजेते प्रथम भारतीय व्यक्ती कोण आहेत ?

ऑस्कर पुरस्कार विजेते प्रथम भारतीय भानु अथैया आहेत. त्यांना 1983 मध्ये “गांधी” या चित्रपटातील Costume डिजाइन साठी ऑस्कार पुरस्कार मिळालेला आहे.

ऑस्कर पुरस्काराचे दुसरे नाव काय आहे?

ऑस्कर पुरस्काराचे दुसरे नाव अकादमी पुरस्कार आहे.

2024 मध्ये कोणत्या चित्रपटाने सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकले ?

2024 मध्ये सर्वाधिक 7 ऑस्कर पुरस्कार ओपेनहाइमर या चित्रपटाने जिंकले. ओपेनहाइमर चित्रपटाचे निर्देशक क्रिस्टोफर नोलन आहेत.

सर्वाधिक ऑस्कार पुरस्कार विजेता चित्रपट कोणता आहे ?

सर्वाधिक ऑस्कार पुरस्कार विजेता चित्रपट तीन आहेत. 1) Ben-Hur ( 11 ऑस्कार पुरस्कार ), 2) Titanic ( 11 ऑस्कार पुरस्कार ) , 3) The Lord of the Rings: The Return of the King  ( 11 ऑस्कार पुरस्कार )

जगातील सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार कोणी जिंकले आहेत?

आतापर्यंत ज्या व्यक्तीने सर्वाधिक ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत ते म्हणजे वॉल्ट डिस्ने कंपनीचे संस्थापक वॉल्ट डिस्ने. त्याने आपल्या आयुष्यात 26 ऑस्कर पुरस्कार जिंकले आहेत.

ऑस्कार पुरस्कार अधिक माहितीसाठी हे वाचा :- Click Here

हे ही वाचा :-

ज्ञानपीठ पुरस्कार 1965 ते 2023 संपूर्ण माहिती…

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सव पुरस्कार 2024 संपूर्ण माहिती.

भारत रत्न पुरस्कार 1954 ते 2024 संपूर्ण माहिती.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 1995 ते 2023 संपूर्ण माहिती.

राज्य पोलीस दलात शिपाई संवर्गातील 17531 पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सूरवात…